SSY : सुकन्या समृद्धी योजना बद्दल सविस्तर माहिती.( फायदे आणि तोटे )

SSY : सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता !
- SSY : सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षापेक्षा अधिक नसावे, मोठया रकमेचा खर्च न करिता आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी हि योजना एक उत्तम पर्याय आहे.
- केवळ मुलीच सुकन्या समृद्धी बचत खाते उघडण्यास पात्र आहेत, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत बचत खाते केवळ मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजनाबचत खाते उघडतांना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे, मुलीच्या वयाचा पुरावा जोडावा लागेल.
- एका मुलीसाठी एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी बचत खाते उघडता येत नाही, एक कुटुंबातील केवळ दोन सुकन्या समृद्धी खाते म्हणजेच प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये समृद्धी बचत खाते काही विशेष प्रकरणांमध्ये उघडले जाऊ शकते.
- जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मापूर्वी एका मुलीचा जन्म झाला असेल किंवा तीन मुली आधी एकत्र जन्माला आली असेल तर अशा परिस्थितीत तिसरे खाते उघडता येते.
- यामध्ये जुळ्या किंवा तिप्पटांचा जन्मनंतर मुलीचा जन्म झाल्यास तिसरे SSY खाते उघडता येत नाही.
- सुकन्या समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रेज्या नागरिकांना त्यांच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना बचत खाते उघडायचे आहे त्यांनी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र :-पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी संबंधित मुलीच्या जन्माचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे, हे जन्म प्रमाणपत्र मुलीचा जन्म झालेल्या रुग्णालयातून किंवा सरकारी एजन्सीमार्फत मिळू शकते.
- पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा :-मुलीसाठी हे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांनी खाते उघडण्यासाठी त्यांच्या वास्तव्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. हा पुरावा खालीलप्रमाणे असू शकतो.
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- रेशन कार्ड
- वीज बिल / टेलिफोन बिल
- आधार कार्ड
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
सुकन्या समृद्धी योजना 2023 अर्ज प्रक्रिया
केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना हि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरु केली आहे या योजनेच्या अंतर्गत मुलींचे पालक आपल्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतात, यासाठी या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या नावाने बचत खाते उघडल्या जाते, हे सुकन्या समृद्धी बचत खाते उघडतांना काही महत्वपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या नावाने गुंतवणूक करणारे पालक किंवा कायदेशीर संरक्षक यांची माहिती देणे आवश्यक आहे, या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते उघडण्यासाठी खालीलप्रमाणे महत्वपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
-
- मुलीचे नाव
- बचत खाते उघडणाऱ्या पालकांचे, कायदेशीर पालकांचे नाव
- चेक / DD क्रमांक आणि तारीख
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी)
- वर्तमानातील आणि कायमचा पत्ता ( पालकांच्या ओळखपत्रानुसार)
- त्यानंतर KYC कागदपत्र (पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र)
- तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मिळवू शकता.
- त्यानंतर वरीलप्रमाणे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी आणि कागदपत्रांसह अर्ज बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा.
- यानंतर पोस्ट ऑफिस / बँकेकडून या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
- यानंतर सुकन्या समृद्धी योजना बचत खात्यामध्ये किमान राशी 250/- रुपये भरून खाते उघडावे लागेल. त्यानंतर अर्जदाराल एक पासबुक देण्यात येईल, यानंतर अर्जदार या बचत खात्यात गुंतवणूक करू शकतात.
- अशा प्रकारे नागरिक सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना बदल झालेले पाच नियम !
सुकन्या समृद्धी योजनेला अधिक फायदेशीर आणि सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाने या योजनेत काही बदल करून योजनेला सुधारित करण्यात आली आहे, केंद्र शासनाने या योजनेत पाच प्रकारचे बदल केले आहे त्यामळे आता या योजनेत गुंतवणूक करणे तसेच योजनेचे बचत खाते बंद करणे अधिक सुलभ करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे बचत खाते ऑपरेट करण्याच्या वयामध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे.
- सुकन्या समृद्धी योजना डिफॉल्ट होणार नाही :-सुकन्या समृद्धी योजना बचत खात्यामध्ये दरवर्षी किमान 250/- रुपये आणि कमाल 1.5 लाख गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अगोदर सुकन्या समृद्धी बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा करण्यात आली नाही तर बचत खाते डिफॉल्ट समजण्यात येत होते, परंतु बदलेल्या नियमांनुसार बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा करण्यात आली नाही तरीही खाते डिफॉल्ट घोषित होणार नाही. आणि त्यानंतर बचत खात्याला पुन्हा सक्रीय करण्यात आले नाही तरीही बचत खाते परिपक्व होईपर्यंत वर्तमान व्याजदरानुसार जमा असेलेल्या रकमेवर व्याज जमा होत राहील.
- तिसऱ्या मुलीच्या बचत खात्यावर आयकर सूट मिळेल :-या योजनेमध्ये सुरुवातीला दोन मुलींच्या बचत खात्यांवर आयकर नियम 80C च्या अंतर्गत सूट प्राप्त होती, परंतु तिसऱ्या मुलीसाठी हि आयकर सूट मिळत नव्हती, नवीन नियमांनुसार एक मुलगी असल्यानंतर जर दुसऱ्या वेळेस जुळ्या मुलींचा जन्म झाला तर तिन्ही मुलींचे बचत खाते उघडता येईल व खात्यांवर आयकर सूट सुद्धा मिळेल.
- सुकन्या समृद्धी खाते मुदतपूर्व बंद करणे :-या योजनेच्या नवीन नियमांनुसार योजनेंतर्गत मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर किंवा खातेदाराचे गंभीर आजार किंवा खात्याची देखरेख करण्याऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते, यासाठी रीतसर भरलेल्या अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यावर पालकाला खात्यातील शिल्लक रक्कम आणि मृत्युच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याजाची रक्कम दिली जाईल. खातेदाराच्या मृत्यूची तारीख आणि खाते बंद करण्याच्या तारखेदरम्यान खात्यात ठेवलेल्या रकमेवर पोस्ट ऑफिस बचत खात्यांवर लागू असलेल्या दराने व्याज दिले जाईल.
- सुकन्या समृद्धी खात्याचे संचालन :-सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत शासनाच्या नवीन नियमांनुसार ज्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी बचत खाते आहे, ती मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्याशिवाय तिच्या बचत खात्याचे संचालन करू शकत नाही, सुरवातीला हे वय 10 वर्षे होते. यामध्ये मुलचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर पालकांना त्या संबंधित कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील.
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज :- सुकन्या समृद्धी योजनेच्या नवीन नियमांनुसारसुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज आता आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केल्या जाईल, त्यासोबत सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याचे वार्षिक व्याज येथे जोडले जाईल. सुकन्या समृद्धी खात्यात चुकीच्या पद्धतीने जमा झालेले व्याज वापस करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे.