Varas Nondani: वारस नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची ? तलाठी कार्यालयामध्ये न जाता.

Varas Nondani : जमिनीशी सदर्भात अनेक वेळा तुम्ही वारस नोंदणी हा शब्द ऐकला असेल. शेतजमीन ज्या व्यक्तीचे नाव वर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेत जमिनीच्या मालकाच्या पश्चात वारसाना जमिनीचे हक्क मिळत असतात. त्याकरिता त्या वारसांना त्या शेत जमिनीवर वारस नोंद करावी लागत असते. शेत जमीन नावावर असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. आता वारस नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची जावश्यकता नसून ऑनलाईन पद्धतीने वारस नोंद करता येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण Varas Nondani Online करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
जमिनीच्या नोंदीसाठी ई- हक्क प्रणाली चा वापर करा
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे, या ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा ऑनलाईन पुरविण्यात येत आहे. ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून जमिनीची संदर्भाची अनेक प्रकारच्या नोंदी तसेच बाबी ऑनलाईन घरबसल्या करता येत आहेत. हक्क प्राण्यांच्या माध्यमातून शेतक-यांना घरबसल्या सात ते आठ प्रकारची फेरफार घेता येतात, त्यामध्ये सातबारावर वारसाची नोंद करणे तसेच सातबारावर बोजा चडवणे, सातबारा वरील बोजा कमी करणे, सातबारा वरील नावात दुरुस्ती करणे, सातबारा वर ई. करार करणे अशा प्रकारच्या विविध जॉनलाइन सुविधा ही हक्क प्रणाली मुळे उपलब्ध झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण Varas Nond Online जाणून घेणार आहोत.
वारस नोंद ऑनलाईन कशी करायची ? Varas Nondani Online:
ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला वारस म्हणून ऑनलाईन पद्धतीने varas nond करता येत असून त्याकरता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी लेख या वेबसाईट वर जा.
महाभुमी च्या वेबसाईट वर जाण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
2. या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला सातबारा दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
3. आता सातबारा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या वरील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच वारसाची नोंद ऑनलाईन करण्यासाठी https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंक वर क्लिक करा.
4. आता तुमच्यासमोर पब्लिक डेटा एन्ट्री नावाचा एक नवीन पेज ओपन झालेला आहे त्यामध्ये प्रोसेस टू लॉगिन करा.
5. आता तुम्हाला नवीन तुमचा अकाउंट ओपन करायचा आहे त्याकरिता क्रिएट न्यू यूजर या पर्यायाचा वापर करा.
6. आता तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून तसेच खाली दिलेल्या कॅपच्या टाकून लॉगिनकरून घ्या.
7. आता तुमच्यासमोर विविध ऑप्शन दिसतील त्यापैकी 7/12 mutations या पर्यायावरक्लिक करा.
8. आता फेरफार अर्ज प्रणाली नावाचे नवीन पेज ओपन होईल, त्यामुळे तुमच्या गावाची तसेच तालुक्याची संपूर्ण माहिती प्रविष्ट करा. तसेच तलाठ्याकडे जो फेरफार करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडून घ्या. आता वारस नोंद हा पर्याय निवडा.
Atuvrusti nukasan bharpai : या जिल्ह्यांना मिळणार 1214 कोटी.
9. आता तुमच्यासमोर वारस फेरफार अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये अर्जदाराची माहिती प्रविष्ट करा.
10. त्यानंतर माहित व्यक्तीचे नाव किंवा खाते क्रमाक टाका. खातेदाराचा गट क्रमांक निवडा तसेच मृत्यु दिनांक टाका.
11. वारस म्हणून ज्यांची नावे सातबारा लावायची आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी प्रविष्ट करा.त्या वारसदाराचे मयत व्यक्तीशी असलेले नात निवडा,Land Record
12. आता तुम्हाला मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला तसेच इतर कागदपत्रे त्यामध्ये कुटुंबातील सदस्याची माहिती तसेच रेशन कार्ड जमिनीची कागदपत्रे जोडू शकतात, तसेच शपथपत्र सुद्धा जोडावे. हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
13. शेवटी भरलेला अर्ज तसेच अपलोड केलेले सर्व कागदपत्रे चेक करून तसेच स्वयंघोषणा पत्रावर टिक करून अर्ज सबमिट करायचा आहे. 14. तुमच्या अर्जाची नंतर छाननी करण्यात येईल पुढील प्रक्रिया करून सातबारावर वारसाची नोंद करण्यात येईल.