Maharashtra Vidhan Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमध्ये घबाड सापडलं, चेकपोस्टवर 190000000 रुपयांचं सोनं-चांदी जप्त
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या
आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर-
जळगाव रोडवर स्थिर पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी सिल्लोड
फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले आहेत.
संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे
जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात
19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे
असल्याची माहिती सध्या मिळत आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या स्वाधीन करण्यात
आले आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले
आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटी रुपयांचे सोन्या-
चांदीचे दागिने पकडले. स्थिर पथकाकडून ही गुरुवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. हे दागिने
जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याचे समोर आली आहे. स्थिर पथकाने सदर सोनं-चांदी
जीएसटी विभागाकडे दिले आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना
बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.
अमरावतीमध्ये 5 कोटी रुपयांचं सोने-चांदी घेऊन जाणारं वाहन जप्त-
अमरावतीत पोलीसांनी 5 कोटी रुपयाचं सोने-चांदी घेऊन जाणारं वाहन जप्त करण्यात आलं आहे.
यासंबंधित नागपुरी गेट पोलीस अधिकचा तपास करत आहे. सिक्वेल लॉजीस्टिक नागपूर यांच वाहन
असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. हे वाहन नागपूर वरून सोने आणि चांदीचे दागिने घेऊन विविध
जिल्ह्यात वितरण करत असते. विशेष म्हणजे हेच वाहन तिवसा मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पकडले
होते. त्यावेळी 64 किलो सोने आणि चांदीचे दागिने होते. तीन दिवसानंतर सोडून देण्यात होते.
हे पण वाचा:gas cylinders मोफत 3 गॅस सिलेंडर मिळण्याची तारीख जाहीर! पहा वेळ आणि तारीख
येवल्यात 41 लाखांची रोकड जप्त-
येवल्यात देखील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. एटीएम वाहनातून 41
लाखांची रोकड जप्त करण्यात आली. पैशांची पावती
व प्रत्यक्ष रक्कमेत 10 लाखांची तफावत आढळल्याने कारवाई केली. तर दुसऱ्या एका कारवाईमध्ये 1 लाख
92 हजार 880 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. बँकेतून रोकड घेवून जात असतांना करण्यात आली ही
कारवाई केली गेली. पैसे कोणाचे व कुठे जात होते याचा पोलीस शोध घेत आहेत.