Crop Insurance : रब्बी पीकविम्यापोटी ४०४ कोटींचे वितरण
Rabi Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत ४०४ कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पीक नुकसानीपोटी आतापर्यंत ४०४
कोटी रुपयांच्या भरपाईचे वितरण करण्यात आले
आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी अडीचशे कोटीहून अधिक भरपाईचा यात समावेश आहे.
२०२३-२४च्या रब्बी हंगामात राज्यात एकूण नऊ विमा कंपन्यांनी कंत्राटे घेतली होती. यात भारतीय कृषी विमा
कंपनी (एआयसी), चौलामंडल, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, ओरिएंटल, रिलायन्स,
एसबीआय, युनायटेड इंडिया व युनिर्व्हसल सोंपो या कंपन्यांचा समावेश होता.
या कंपन्यांना विमा हप्त्यापोटी शेतकरी, केंद्र व राज्य शासनाकडून एकूण २१२५ कोटीP रुपये मिळाले होते.
त्यापैकी सर्वाधिक रक्कम म्हणजे ५४१ कोटी रुपये
भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले. एचडीएफएसी इर्गोला ३१२ कोटी रुपये, तर ओरिएन्टल कंपनीला
३४७ कोटी रुपये मिळाले. इतर कंपन्यांना मात्र विमा हप्त्यापोटी २०० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमा मिळाल्या होत्या.
विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाखाली शेतकऱ्यांना
भरपाईसाठी ३१७ कोटींहून अधिक रक्कम निश्चित केली होती.
त्यापैकी २६८ कोटी रुपये वितरित करण्यात आले.
‘काढणीपश्चात नुकसान’ या घटकाखाली १५९ कोटींहून अधिक रक्कम वाटावी लागेल, असे
प्राथमिकरीत्या ठरविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ३७ कोटी रुपयांच्या आसपास भरपाई
प्रत्यक्ष देण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई १६३ कोटी रुपयांच्या
आसपास आहे. त्यातील ९९ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली
आहे. मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रक्रियेत अडचणी आल्या. आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा
आढावा घेतला जाईल व उर्वरित भरपाईचे वितरण पूर्ण केले जाईल. नुकसान भरपाईची रक्कम ज्या
शेतकऱ्यांच्या नावे एक हजार रुपयांच्या खाली निघते आहे, अशाच रकमांचे वितरण थांबलेले आहे.
हे पण वाचा:SBI important rules:SBI ने जारी केले 5 महत्वाचे नियम! तुमचे खाते असेल तर आत्ताच करा हे काम
..अजून २३७ कोटी रुपये
रब्बी हंगामातील पीकविमा नुकसान भरपाईपोटी पीककापणी प्रयोगाच्या आधारे अजून ६५ कोटी रुपये
वितरित केले जाणार आहेत. याशिवाय काढणीपश्चात घटकाखाली १२३ कोटी रुपये, तर स्थानिक नैसर्गिक
आपत्ती घटकामधून आणखी ५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे विमा भरपाईपोटी राज्यातील
शेतकऱ्यांच्या खात्यात अजून २३७ कोटी रुपये जमा होतील, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.