SSC HSC Timetable:विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.! 10वी 12वी परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर 3 महिने तयारीचे. इथं पहा वेळापत्रक!
SSC HSC Timetable नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा दहा दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीची परीक्षा 11
फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुढील तीन
महिन्यांचा कालावधी पूर्णपणे नियोजनबद्ध अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांना खूप चिंतेत टाकणारी असते. अशा परिस्थितीत परीक्षेच्या
तयारीसाठी आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी योग्य तयारी आवश्यक आहे. विशेषता बारावीच्या
विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा कालावधी चांगल्या प्रकारे नियोजन करून अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
यासाठी पालकांनी देखील त्यांच्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिला
पेपर मराठी, हिंदी आणि इतर प्रथम भाषा या विषयांचा असेल. यानंतर इतर शालेय शाखांसाठी विज्ञान, कला,
वाणिज्य आणि एमसीव्हीसी यासारख्या विविध शाखांच्या परीक्षा होणार आहेत.
SSC HSC Timetable कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष तयारी
परीक्षांमध्ये चोरी रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील आणि सरमिसळ पद्धतीचा वापर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यावर राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून काही
हरकती प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्या किरकोळ होत्या. यामुळे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे.
परीक्षा 10 दिवस आधी का घेतली?
विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट परीक्षेच्या तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळवता येईल.
परीक्षेचा निकाल 15 ते 20 दिवस आधी लागण्याची शक्यता आहे.
पुरवणी परीक्षा वेळेत घेण्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशात अडचणी येणार नाहीत.
इयत्ता बारावी वेळापत्रक
प्रात्यक्षिक परीक्षा : 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
लेखी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
इयत्ता दहावी
प्रात्यक्षिक परीक्षा : 3 ते 20 फेब्रुवारी
लेखी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
अभ्यासाच्या काही टिप्स
विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहणे आवश्यक आहे.
रात्री जागरण टाळावे.
शिळे अन्न न खाणे.
तासन्तास एकाच ठिकाणी बसून न राहता, थोडा व्यायाम करावा.
अभ्यासाचे योग्य वेळापत्रक
नियमितपणे पेपर सोडवून पहा.
पौष्टिक आहार घ्या.
थोडे मनोरंजनही करा, पण त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका.
अशाप्रकारे योग्य तयारी आणि नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळवता येतील.