Gay Gotha Anudan Yojana 2024:गाय गोठा बांधण्यासाठी आता मिळणार अनुदान : असा घ्या लाभ..! |
Gay Gotha Anudan Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपलं सहर्ष स्वागत
आहे. महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन व्यवसाय
करत असतात. मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाय, म्हशी साठी एखाद पक्क
छत असलेला गोठा बांधता येत नाही. अशा सर्व पशुपालकांना आता गाई, म्हशी साठी पक्का गोठा
बांधण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना 2024 अंतर्गत लाभ मिळणार आहे.
गाय गोठा अनुदान योजना 2024 : ठळक मुद्दे
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट,गाय गोठा अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये,गाय गोठा अनुदान योजनेचे नियम व
अटी,शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी लागणारे
आवश्यक कागदपत्रे
गाय गोठा अनुदान 2024 योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत
केलेल्या कामाचे फोटो
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज रद्द होण्याची कारणे :
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024 Form👉येथे क्लिक करा
गाय गोठा अनुदान योजना शासन निर्णय
आजच्या या लेखामध्ये आपण गाय गोठा अनुदान योजना 2024 विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया या विषयी संपूर्ण
माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत व्यवस्थित वाचा. जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळविता येईल.
Gay Gotha Anudan Yojana 2024
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करून
नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे
लागते. त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध
करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत
आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैशी असतात कारण गायी आणि म्हशी पालन हा
शेतकऱ्यांना पारंपरिक आणि शेतीसाठी जोडव्यवसाय
आहे परंतु गायी-म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना
ठेवण्यात येणारी जागा खडबडीत व आबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते.
ग्रामीण भागातील गोठे हे कच्चे बांधलेले असतात. जनावरांचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था
नसल्यामुळे ते गोठ्यात इतरत्र पडलेले असते.तसेच पावसाळ्यात जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त
झालेले असते.याच जागेत जनावरे बसत असल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होतात.
त्यामुळे काही जनावरांना स्तनदाह होऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात काही वेळेस गाई म्हशींची कास
निकामी होते.अस्वच्छतेमुळे जनावरांच्या खालील बाजूस जखमा देखील होतात.बऱ्याच ठिकाणी
गोठ्यामध्ये जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी सुद्धा बांधलेली नसतात.जनावरांना मोकळ्या जागेत चारा
टाकला जातो या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्यामुळे जनावरे तो चारा खात नाहीत व चारा वाया जातो.
गाय गोठा अनुदान योजना 2024 : ठळक मुद्दे,योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना 2024,कोणी सुरू
केली महाराष्ट्र सरकार,योजनेची सुरुवात 3 फेब्रुवारी 2021,विभाग कृषी विभाग योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे,लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरीलाभ
जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान,अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन,
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्दिष्ट :
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय गोठा
अनुदान योजनाची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक मुख्य उद्देश्य आहे.
गाय गोठा अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये :
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
या योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
गाय गोठा अनुदान योजनेचे नियम व अटी :
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
आपल्याकडे असलेल्या जनावरांचे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक
या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
शेतकऱ्याने जर या आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या एख्याद्या
योजनेअंतर्गत गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान : Gay Gotha Anudan Yojana
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी 77188/- रुपये अनुदान देण्यात येईल.
6 पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
गुरांकरिता 26.95 चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी 7.7 मी. आणि रुंदी 3.5 मी.असेल
गव्हाण 7.7 मी. X 0.2 मी. X 0.65 मी. आणि 250 लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल.
हे पण वाचा:free solar pump:मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप चेक करा यादीत नाव
गाय गोठा अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
अर्जदाराचे आधार कार्ड
रेशन कार्ड
अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
अर्जदाराचे मतदान कार्ड
मोबाईल क्रमांक
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक)
अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
आदिवासी प्रमाणपत्र
जन्माचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न
घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र /
ना हरकत प्रमाणपत्र.
ग्रामपंचायत शिफारस पत्र
अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक,अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व
ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र
असणे आवश्यक,अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक,
अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
गाय गोठा अनुदान 2024 योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत
केलेल्या कामाचे फोटो
सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो
काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो,काम सुरू असतानाचा फोटो,काम पूर्ण झालेल्याचा फोटो व लाभार्थी सह
फोटो इत्यादी,हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत 7 दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत : Gay Gotha Anudan Yojana Maharashtra
सर्वप्रथम आपणास या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी
कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची खूण करावी लागेल.
त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे.
अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल त्यासंबंधीचा आवश्यक
कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे.
लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस
पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही
शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.
हे पण वाचा:Ration card:राशन कार्ड धारकांना आजपासुन मिळणार राशन आणि या वस्तू मोफत
अर्ज रद्द होण्याची कारणे :
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
अर्जात खोटी माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोठा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द होईल.
एकाच वेळी 2 अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराजवळ गाय उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदार शेतकरी हा ग्रामीण भागातील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.